शाळकरी मुलीशी दोघांचे गैरवर्तन

श्रीगोंदे पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

श्रीगोंदे – येथील एका अल्पवयीन मुलीला शाळेत जाताना अडवून गैरवर्तणूक करण्याचा प्रकार घडला. शहरातील एका वस्तीवर राहणारी अल्पवयीन मुलगी सोमवारी (दि.22) ऑक्‍टोबरला सकाळी पावणेदहा वाजता शाळेत जात होती. यावेळी तिचा पाठलाग करून शाळेजवळ अडवून तिच्यासोबत गैरवर्तन केले.याबाबत मुलीने श्रीगोंदे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीच्या आईनेदेखील पोलीस ठाण्यात मुलीच्या घरातील चौघांविरोधात रात्री घरात घुसून आपल्याला व दिराला दमदाटी, धक्काबुक्की करून 15 हजार रुपये रोख व मंगळसूत्र चोरुन नेल्याची, घरातील सामानाची तोडफोड करत, जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी व तिचा भाऊ शाळेत जात असताना आरोपीने त्यांना गाडीवर बसवून शहरात सोडले. त्यानंतर मुलगी एकटी शाळेत जात असताना आरोपीने एकटी पाहून शाळेजवळील बोळीत अडवून तिच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर मुलीच्या कुटुबियांनी आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या मित्राने मुलीच्या घरच्यांना फोन करून शिवीगाळ केल्याने, मुलीने आज श्रीगोंदे पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)