कोपरगावात घरफोडी करणारी टोळी नाशिकची

नगर  – कोपरगावमध्ये घरफोडी करणारी टोळी नाशिक जिल्ह्यातील मालेगावची असून, त्यातील सात जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रईस मुसा शेख (वय 52), अरबाज रईस शेख (वय 19), परवीन रईस शेख (वय 40, सर्व रा. हिरापन्ना कॉलनी), शादाबा कमरअली खान (वय 27, झाकीर हुसेन कॉलनी, मालेगाव, जि. नाशिक), जहेद मुस्तफा कोरडिया (वय 19, रा. लोढा इखवा, मिरा रोड पूर्व, जि. ठाणे) व मुकेश मोहनलाल जैन (वय 45, रा. स्टेट बॅंक चौक, कॅम्प रोड, मालेगाव, जि. नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

टकल्या रहीम बेग ऊर्फ इलियास (रा. आएशानगर, मालेगांव) हा पसार आहे. कोपरगावातील मयूर प्रफूल्ल बोरा यांच्या घरातून 16 लाख पाच हजार, तर एकनाथ सदानंद पेरणे यांच्याही घरी चोरी करत 10लाख 68 हजार 204 रुपये या टोळीने चोरून नेले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी खबऱ्यांमार्फत या टोळीचा माग काढला. रईस शेख याला ताब्यात घेतल्यानंतर या टोळीचा शोध लागला.

-Ads-

रईस हा कुख्यात चोर असून, त्याच्याविरोधात नाशिक, नगर, ठाणे व सातारा जिल्ह्यात 23 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. चारचाकी वाहन, दागिने, रोख रक्कम असा एकूण 12 लाख 80 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)