मजुरांमध्ये झालेल्या भांडणामध्ये एकाचा खून

नगर  – अकोळनेर (ता. नगर) येथील तरोडी मळा शिवारातील डाळिंब बागेत मजुरीची कामे करणाऱ्या मजुरांमध्ये भांड होऊन त्यातील एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्या आहे. गणेश विठ्ठलराव जाधव (रा. तरोडी मळा) यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.

गणेश जाधव यांचे वडील विठ्ठलराव यांनी डाळिंबाच्या बागेत मजुरीच्या कामासाठी रेल्वे स्टेशन येथून सहा मजूर आणले होते. बागेतील काम संपल्यानंतर हे मजूर झोपण्यासाठी थांबले होते. यावेळी त्यांच्यात वाद होऊन भांडणे झाली. इतर पाच मजुरांनी त्यात 25 ते 30 वर्षाच्या मजुराच्या डोक्‍यात दगड मारून जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला. या खुनानंतर हे मजूर पळून गेले. बागेतील मजूर कोठे गेली याच्या पाहणीसाठी गणेश जाधव गेल्यावर त्यांना एकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर तालुक्‍याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना संपर्क साधून त्यांनी घटनेची माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना व शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गणेश जाधव यांच्या तक्रारीवरून नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)