चोरीतील 25 मोबाईल पोलिसांकडून जप्त

नगर : झारखंड येथील चोरांकडून जप्त केलेले मोबाईल दाखविताना पोलीस निरीक्षक दिलीप पवार.

श्रीरामपूर आठवडे बाजारात हातसफाई : सव्वा एक लाखांचा मुद्देमाल जप्त

नगर – श्रीरामपूच्या आठवडे बाजारा हातचलाखी करून मोबाईल चोरी करणारी झारखंड राज्यातील तिघांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांकडून पोलिसांनी 1 लाख 20 हजार रुपयांचे 16 चोरीचे मोबाईल जप्त केले आहे. हरिष गर्जे (रा. कांदामार्केट, श्रीरामपूर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गोविंदकुमार ठाकूर (वय 20, रा. महादापूर, जि. साहेबगंज), शुभमकुमार चुन्नू माहोतो (वय 19, रा. तीनपहाडगांव, जि. साहेबगंज) व तुफान रघू रियासन (वय 18, रा. मेहदीपूर, जि. साहेबगंज) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. श्रीरामपूर येथील आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेऊन हे मोबाईल चोरी करत होते. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या चोरांची माहिती घेतल्यावर त्यात गोविंदकुमार राय याचे नाव समोर आले.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या दोन साथीदारांचे आणखी नावे समजली. त्यानुसार शुभमकुमारव तुफान याला दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या तिघांना अटक करून श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)