माजी नगरसेवकाच्या नातेवाईकाचा अड्डा

नगर – माजी नगरसेवकाच्या नातेवाइकाच्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकून सहा लाख तीन हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या छाप्यात 18 जणांविरोधात मुंबई जुगार ऍक्‍टमधील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सागर प्रकाश गर्जे (रा. गुलमोहोर रोड), अंबादास सुदर्शन चेन्नुर, स्वप्नील राजेंद्र दातरंगे (रा. दातरंगे मळा), ज्ञानेश्‍वर मच्छिंद्र दौंडकर (रा. तोफखाना), विकास मायकल शिंदे (रा. डॉनबॉस्को कॉलनी), प्रतीक अनिल गांधी (रा. कवडेमळा), किरण दत्तात्रय बारस्कर (रा. सोनार नगर), रवींद्र सुरेश बारस्कर (झारेकर गल्ली), विशाल कांतीलाल गांधी (रा. माळीवाडा), सागर हिरालाल कासावा (रा. पटवर्धन चौक), नंदकिशोर गेंडालाल बिंद्रे (रा. मोचीगल्ली), सचिन दिलीप सुरसे (रा. नालेगाव), सुरज दिपक तोरटकर (रा. शिवाजीनगर), शहानवाज लियाकत शेख (रा. मुकुंदनगर), संतोष लक्ष्मण होनराव (रा. डावरेगल्ली), कुणाल आरासाम कुराने (रा. मुकुंदनगर), हेमंत कुंडलिक गिरवले (रा. गोविंदपुरा) व जागा मालक चैतन्य जाधव (रा. पूर्ण नावा माहित नाही) या 18 जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नगर-मनमाड रोडवरील बंधन लॉनमध्ये एका खोलीमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्ष संदीप मिटके यांना मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)