टोळक्‍याकडून सावेडीत महिलेची छेडछाड

तोफखाना पोलिसांनी तिघांना केली अटक : भर रस्त्यावर घडला प्रकार

नगर – सावेडीतील जुने लेबर कोर्टजवळ सहा जणांच्या टोळक्‍याने भर रस्त्यावर महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अजय नेटके, संग्राम भिंगारदिवे, मयुर भिंगारदिवे, अनुच धीवर आणि इतर दोन, अशा सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अजय नेटके, संग्राम भिंगारदिवे व मयुर भिंगारदिवे या तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या तिघांना …. पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

महिला ही तिच्या दुचाकीवरून रात्री आठ वाजता घरी येत होती. त्यावेळी घरासमोरील रस्त्यावर काही टोळके उभे होते. घरासमोरच टोळके असल्याने महिलेने दुचाकी हळू करत वाट काढण्यासाठी ती थांबवली. त्यावेळी टोळक्‍याने या महिलेच्या दिशेने अश्‍लील हावभाव केले. काही शब्दप्रयोग केले. यातील अजय नेटके हा महिलेच्या दुचाकीला आडवा झाला आणि तिचा हात धरत ओढले. या प्रकाराने दुचाकीवरील महिला गांगरली आणि ओरडली. त्यावेळी अजयबरोबर असलेले संग्राम, मयूर व अनूच पुढे येत महिलेशी लज्जास्पद वर्तन केले. महिलेने विरोध करण्यास सुरूवात केल्यावर या टोळक्‍याने शिवीगाळ केली.

या टोळक्‍यातून स्वतःला वाचवित महिलेने घराकडे धाव घेतली. तोपर्यंत हे टोळके पसार झाले होते. महिलेने झालेल्या प्रकाराची माहिती घरच्यांना दिली. त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात येऊन पीडित महिला आणि नातेवाइकांनी तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना आदेश देत तत्काळ या प्रकारातील आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी टोळक्‍यातील तिघांना अटक केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)