घराची कडी उघडून चोरी

पाथर्डी  – तालुक्‍यातील माळेगाव येथे घराची कडी उघडून चोरट्यांनी सुमारे 45 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत प्रदीप भुजंगराव गायकवाड यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रदीप गायकवाड आपल्या परिवारासमवेत माळेगाव येथे राहतात. बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर गायकवाड आपल्या परिवारासमवेत घरात झोपले होते. बैठकरूमच्या दरवाजाची कडी आतून लावलेली होती. मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरांनी कडी उघडून घरात प्रवेश केला.

कपाटात ठेवलेले 25 हजार रुपये रोख व 20 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. आवाज आल्यानंतर गायकवाड जागे झाले. तेव्हा घर उघडे असल्याचे व कपाटातील रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी गायकवाड यांच्या तक्रारीवरून भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पालवे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)