घरात घुसून चोरी करणारा सिद्धार्थनगरमधल्या एकाला अटक

नगर – रात्रीच्या वेळी घरात घुसून चोरी करणारा सिद्धार्थनगरमधील अजय विश्‍वास बुलाखे (वय 20) याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील बुलाखे याचा साथीदार किशन पवार हा पसार आहे. अजय बुलाखे याच्याकडून पोलिसांनी चोरलेला सहा हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला आहे. तोफखाना पोलिसांकडे त्याला वर्ग केले आहे.

लक्ष्मण मच्छिंद्र गोफणे (वय 21, हल्ला रा. सिद्धार्थनगर) यांच्या घरात घुसून 20 डिसेंबरला अजय बुलाखे याने चोरी केली होती. चाकुचा धाक दाखवित व शिवीगाळ करत त्याने सहा हजार रुपयांचा मोबाईल व पाच हजारांची रोख रक्कम, असा एकूण 11 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तोफखाना पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हा तपास केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)