जेऊरमध्ये तोडमलवाडीवर लहान्यांची भांडणे मोठ्यांपर्यंत

नगर – लहान मुलांच्या भांडणावरून बायजाबाई जेऊरमधील तोडमलवाडीवर मोठ्यांमध्ये भांडणे झाली. लाकडी दांडक्‍याने झालेली ही भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या महिलेच्या गळ्यातील मनीमंगळसूत्र गहाळ झाला.

सविता तोडमल यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. राधाकिसन बाबुराव आवारे, शिवा राधू आवारे, बाबा राधू आवारे, विजय मच्छिंद्र तोडमल, अशोक सुदाम तोडमल व मंदाबाई अशोक तोडमल (रा. जेऊर, तोडमलवाडी, ता. नगर) यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या या सहा जणांविरोधात जमावबंदी आदेशाचे उल्लंघनाची देखील नोंद घेण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)