सावळीविहीर शिवारातून साडेसतरा हजारांचा मद्यसाठा जप्त

संग्रहित छायाचित्र

शिर्डी : नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या सावळीविहीर शिवारातील एका शेडमधून सुमारे 17 हजार 500 रुपयांचा अवैध बिअर व दारूसाठा शिर्डी पोलिसांनी जप्त केला. बुधवारी (दि.5) दुपारी 12 वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अभिषेक जयप्रकाश सिंग यास अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली.

दरम्यान, शिर्डीसह परिसरात गावठी दारू, तसेच अवैध धंद्यांना उधाण आले असून, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशानुसार पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. दरम्यान, सावळीविहीर शिवारातील एका शेडमध्ये अवैधरित्या बिअर व मद्यसाठा असल्याची माहिती गुप्त खबऱ्याने पोलिसांना दिली होती. त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात, उपनिरीक्षक मोहन बोरसे, उपनिरीक्षक मिथुन घुगे, पो. कॉ. गंभिरे, अंधारे, वर्पे यांच्या पथकाने केली.

-Ads-

छापा मारून शेडमध्ये उपलब्ध असलेला सुमारे 17 हजार 500 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला असून, आरोपी अभिषेक जयप्रकाश सिंग (वय 28, रा. कालिकानगर, शिर्डी) यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)