घरात घुसून मुलीला पळविण्याचा प्रयत्न

सावेडीतील घटना : पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

नगर – घरात घुसून मुलीला बळजबरीने पळून नेण्याचा प्रकार सावेडीतील गुलमोहोर रोडवर आज सायंकाळी चार वाजता घडल्याचेसमोर आले आहे. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी एका युवकाला रात्री ताब्यात घेतले आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवित होते. या युवकाने दोन महिन्याभरापूर्वी देखील या मुलीला त्रास दिला होता. त्यावेळीही तोफखाना पोलीस ठाण्यात मुलीच्या तक्रारीवरून संबंधित युवकाविरोधात विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्यात मात्र युवकाला अजूनही अटक झाली नव्हती.

याबाबत माहिती अशी, पीडित मुलगी ही तिच्या आई-आजोबासमवेत घरात होती. शनिवारी सायंकाळची वेळ होती. मुलगी नियमितपणे काम करत असताना हा युवक थेट घरात घुसला. मुलीला पाहून तिचा हात धरून बळजबरीने तो ओडून घराबाहेर नेऊ लागला. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तुला आजच घेऊनच जातो. युवकाच्या या प्रकारामुळे घरात एकच गोंधळ उडाळा होता. मुलीचे आजोबा आणि आई यावेळी घरातच होते. मुलगी या प्रकाराने घाबरून आरडाओरडा केला. मुलगी आरडल्याने आजोबा आणि आई तिच्या दिशेने धावले. तेव्हा हा युवक मुलीचा हात धरून ओढतच होता. मुलीचे आजोबा आणि आईला पाहिल्यावर युवकाने तेथून पळ काढला.

याच युवकाने दोन महिन्याभरापूर्वी भर रस्त्यावर छेड काढल्याची माहिती मुलीने आईला करून दिली. तोच हाच युवक आहे, याची खात्री पटल्यावर मुलीच्या आईवडिलांनी मुलीसमवेत शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची भेट घेऊन कैफयत मांडली. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मोभालकर उपस्थित होते.

मोभालकर यांनी मिटके यांना या युवकाने दोन महिन्याभरापूर्वी मुलीला छेडल्याची माहिती देत, त्या गुन्ह्यात अजून अटक नसल्याचे सांगितले. उपअधीक्षक मिटके यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत तोफखाना पोलिसांना संपर्क साधून यात थेट कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तोफखाना पोलिसांनी या युवकाला आज सांयकाळी ताब्यात घेतले होते. मुलीच्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)