घरातून पाच लाख 15 हजारांची चोरी

नगर – बंगल्याच्या पाठीमागील बाजूच्या स्वयंपाक खोलीच्या दरवाजाची कडी, कोयंडा तोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. आतील सामानाची उचकापाचक करून कपाटातील पाच लाख पंधरा हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना बुरूडगाव रोडवरील वसंत विहार मागील समता कॉलनीतील “वास्तुश्री’या बंगल्यात शनिवारी (दि.1) पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबतची माहिती अशी की, तेलाचे व्यापारी व सक्कर चौक येथील क्वालिटी दुकानाचे चालक प्रशांत चंपालाल धोकरीया (रा. वसंत विहार मागील, समता कॉलनी लगत, वास्तुश्री बंगला, बुरूडगावरोड) यांच्या बंगल्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या किचन रूमचा दरवाजा अज्ञात चोरांनी कशाने तरी उचकटून कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. आतील सामानाची उचकापाचक केली.

-Ads-

बेडरूममधील कपाटातील पाच लाख पंधरा हजार रुपयाची रोडक चोरून नेली. विशेष म्हणजे चोरटे बंगल्यात आल्यापासून उचकापाचक करून चोरी करून जाईपर्यंत धोकरीया कुटुंबातील कोणाला जाग आली नाही. सकाळी उठल्यानंतर घरात चोरी झाल्याचे धोकरीया यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ कोतवाली पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच कोतवाली पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटना स्थळाची पाहणी करून आजूबाजूला चौकशी केली, तसेच श्वान पथकास पाचारण केले. श्वानाने घराच्या मागील बाजूस असलेल्या चौकापर्यंत माग काढला. श्वान तेथेच घुटमळला यावरून चोरटे येथून कोणत्यातरी वाहनातून गेले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला.दुपारी उशिरापर्यंत पोलिसांची चौकशी व तपासकार्य सुरू असल्याने दुपारी उशिरापर्यंत चोरीच्या गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)