श्रीगोंदे पोलिसांत दोन ठकसेनांविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीगोंदे  – श्रीगोंदे शहरातील व्यापाऱ्यांचा बारकाईने अभ्यास करून त्यानं गंडा घालणाऱ्या दोघांचा आज पर्दाफाश करण्यात आला. येथील दुकानदार अरविंद राऊत यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम संभाजी खेतमाळीस व प्रसाद बापूराव जठार (दोघे रा. लोणीव्यंकनाथ, श्रीगोंदे) असे या ठकसेनांची नावे आहे. या दोघांनी शहरातील अनेक व्यापाऱ्यांना फसविल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.

या प्रकरणी राऊत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या ऑप्टिकल्स दुकानात येऊन खेतमाळीस याने सचिन पाचपुते यांनी तीन हजार रुपये उसने मागितल्याचे सांगितले. पाचपुते यांच्याशी माझे विश्वासाचे नाते असल्याने मी विचारपूस न करता खेतमाळीस यास तीन हजार रुपये दिले. दोन-तीन दिवसांनी मी पाचपुते यांना उसने पैसे मागितले. तेव्हा पाचपुते यांनी उसने पैसेच मगितले नसल्याचा उलगडा झाला.

-Ads-

त्यानंतर संबंधित अनोळखी व्यक्तीची माहिती मी घेतली. त्यानंतर याच व्यक्तीने शहरातील संजय आमले, विवेक राऊत, हितेश मुथ्था व योगेश दिलीप भंडारी यांचीही अशाच प्रकारे फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. राऊत यांच्या तक्रारीवरून खेतमाळीस व जठार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)