मद्यविक्री व मटक्यांवरील छाप्यात 40 जणांना अटक

शेवगाव, जामखेड, नेवासे, श्रीरामपूर तालुक्‍यातील कारवाईत 99 हजारांचा मुद्देमाल जप्त

नगर – स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगर महापालिका आणि श्रीगोंद्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आणि येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम उघडली आहे. जिल्ह्यातील विविध भागात कारवाई करत 33 अवैध धंद्यावर छापे घातले आहेत. त्यातील 40 जणांना गजाआड केले आहे. या कारवाईत सुमारे 99 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेवगाव तालुक्‍यातील शहरटाकळी येथे देशी-विदेशी कंपनीचा विनापरवाना सुमारे 1 हजार 40 रुपयांचा दारूसाठा जप्त केला. यात विलास अप्पासाहेब गवारे (रा. शहरटाकळी) याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मोबाईलवर आकडा लावून बिंगो नावाचा जुगार खेळविताना दिंगबर सीताराम साळवे (रा. भातकुडगाव) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 4 हजार 250 रुपयांचे जुगार साहित्य आणि मोबाईल जप्त करण्यात आला.

राजेंद्र येंबन गायकवाड (रा. शहर टाकळी) हा लोकांना चिठ्ठ्यांवर आकडे लिहून देता मटका नावाचा जुगार खेळविताना आढळला. त्याच्याकडून 1 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना पकडला. अजीज जलील शेख (रा. शिवाजी नगर) याच्याव्रिोधात जुगार प्रतिबंधात्मक कलमान्वये कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 1 हजार रुपये जप्त करण्यात आले. सचिन सत्यविजय शेळके (रा. शेवगाव) याच्याविरोधात जुगार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 1 हजार 250 रुपये जप्त करण्यात आले. शिवाजी अंबादास ओहोळ आणि त्याच्याबरोबर इतर चार व्यक्ती हे तिरट जुगार खेळत होते. त्यांच्याकडून 3 हजार 250 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.

नेवासे येथे रामेश्वर लक्ष्मण सोनावणे (रा. कुकाणा) याच्याविरोधात जुगार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 2 हजार 220 रुपये जप्त करण्यात आले. अभयराजे बापूसाहेब कचरे (रा. सुलतानपूर) याच्याकडून 1 हजार 64 रुपयांचे देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात आले. विजय प्रकाश खंडागळे (रा. शिरसगाव) याच्याकडून 2 हजार 444 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. मधुकर एकनाथ अळकटुे (रा. नेवासे) याच्याकडून जुगार साहित्यासह 1 हजार 250 रुपये जप्त करण्यात आले.

राहुरीतील मांजरी येथे देशी-विदेशी दारुची विनापरवाना विक्री करताना संजय हरिभाऊ शिंदे (रा. पाथर्डी) याला अटक करण्यात आली. 900 रुपयांचा दारूसाठा त्याच्याकडून जप्त करण्यात आला. जामखेड तालुक्‍यातील मोहाफाटा येथे प्रवीण विश्‍वनाथ जाधव याच्याकडून देशीविदेशी मद्याचा 5 हजार 110 रुपयांचा दारूसा जप्त करण्यात आला. चंद्रकांत शंकर मेहेत्रे (रा. जामखेड) याला जुुगार खेळविताना अटक करण्यात आली. त्याच्याकडे 2 हजार 430 रुपयांची रोख रक्कम सापडली. रवींद्र सदाशिव बोदले (रा. जामखेड) याला जुगारात अटक करण्यात आली. त्याच्याकडून 2 हजार 680 रुपये जप्त करण्यात आले.

श्रीरामपूरमध्ये खंडाळा येथे विनापरवाना दारूसाठा विक्रीप्रकरणी दीपक फ्रांसिस गायकवाड याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 5 हजार 110 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. श्रीरामपूर येथील नांदूरच्या दीपक राजेंद्र शिंदे याला जुगारप्रकरणी अटक करण्यात आली. 1 हजार 300 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. संजय शंकर पवार याला सुतगिरणीफाटा येथे गावठी दारूच्या विक्रीप्रकरणी अटक करण्यात आली. शहारूख शफीक शेख आणि इतर आठ व्यक्तींविरोधात तिरट जुगार खेळताना पोलिसांनी कारवाई केली. हा जुगार श्रीरामपूरच्या प्रभाग आठमध्ये खेळविला जात होता. पोलिसांनी येथून 10 हजार 350 रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

अशोक विठ्ठल गायकवाड याला जुगार खेळविताना अटक करण्यात आले. त्याच्याकडून 2 हजार 230 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. मानियल दशरथ पारधे याला जुगारात अटक करण्यात आली. त्याच्याकडून 2 हजार 150 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. संदीप सुरेश शिंदे याच्याकडे 27 हजार 650 रुपयांची गावठी दारू सापडली. त्याला अटक करण्यात आली. पढेगाव येथे रमेश प्रभाकर जाधव याच्याकडे 2 हजार 340 रुपयांचा विनापरवाना मद्यसाठा आढळला. संजय भीमराज पवार याच्याकडेही 1 हजार 476 रुपयांचा विनापरवाना मद्यसाठा सापडला. जामखेड येथे किरण विलास जाधव याला जुगारात अटक करण्यात आली. त्याच्याकडून 2 हजार 230 रुपये सापडले. ओंकार विलास धुमाळ याला

विनापरवाना दारू विक्री करताना सापडला. त्याच्याकडून 2 हजार 496 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
सोनाई येथे दिलीप भीमराज जाधव याच्याकडे विनापरवाना 2 हजार 244 रुपयांचा दारूसाठा सापडला. ज्ञानदेव सोपान दहातोंडे याला देखील विनापरवाना दारू विक्रीत अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे 2 हजार 150 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. संजय श्रीपती बाजारे याला जुगारात अटक करण्यात आली. त्याच्याकडून 2 हजार 160 रुपये जप्त करण्यात आले. शनिशिंगणापूर येथे राहुल संजय शिंदे याला जुगारात अटक करण्यात आली. त्याच्याकडून 2 हजार 100 रुपये जप्त करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)