पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास तीन लाखांना लुटले

राहाता शहरातील घटना : मोटारसायकलवर आलेल्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

शिर्डी  – पिस्तुलचा धाक दाखवून दुचाकी स्वाराकडील दोन लाख 80 हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना राहाता शहरात नगर-मनमाड महामार्गालगत आरसी बागूल ज्वेलर्स येथे मंगळवारी (दि.20) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत राहाता पोलिसांत शहरातील प्रसाद वाईन्स दुकानाचे चालक अनिल नारायण जोशी (वय 65) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी रात्री दहा वाजता वाईन शॉप बंद केले. दुकानातील रोख रक्कम 2 लाख 80 हजार रुपये असलेली पिशवी दुचाकीला अडकवून नगर-मनमाड रोडने घरी जात होतो. आर. सी. बागूल ज्वेलर्स दुकानाजवळ आलो असता दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गाडी थांबवली. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून पैशाची बॅग हिसकावली. मला खाली पाडले, असे फिर्याद म्हटले आहे.

लोकरूचीनगर हा नेहमी गजबजलेला व वर्दळीचा परिसर असून बंदुकीचा धाक दाखवून एवढी मोठी रक्कम लुटून नेल्याची घटना घडल्याने लोकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण परदेशी हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)