नगर – माळीवाडा येथील उज्वला कॉम्प्लेक्स परिसरात उभ्या असलेल्या दोन वाहनांच्या काचा फोडून त्यातील सुमारे 72 हजारांचे साहित्य चोरून नेण्यात आले आहे.
सिद्धार्थ राजन शेलार (वय 32, रा. बुरूडगाव रोड, नगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद झाली आहे. चोरांनी दोन्ही वाहनाच्या काचा फोडून आतमध्ये प्रवेश केला. दोन टायर, बॅटरी, हेड रेस्ट, टेप व जेबीएल असे सुमारे 72 हजार रुपयांचे साहित्य चोरांनी चोरून नेले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा