भायगांवमधील दरोड्यात पाच अटकेत

नगर  – भायगावमध्ये (ता. शेवगाव) दरोडा टाकून लूटमार करणारी पाच जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली आहे. राजून विनायक पगारे (वय 35), गोकुळ भानदास पगार (वय 37, दोघे रा. मजलेशहर), संजय बाबासाहेब पवार (वय 28, रा. भायगांव), अशोक मनोहर कचरे (वय 27) व शिवाजी पंडित गोलवड (वय 27, नवीन दहिफळ, ता. शेवगाव) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

नवनाथ पालवे (रा. माणिकदौंडी, ता. पाथर्डी) यांची भायगावमध्ये (ता. शेवगाव) शेती आहे. शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये 16 ऑक्‍टोबरला रात्री पालवे शेतीचे काम उरकून झोपले होते. त्यावेळी चार चोरांनी पालवे यांना लाकडी दांडक्‍याने मारहाण करत 91 हजार 960 रुपयांची रक्कम व मोबाईल चोरून नेला होता. शेवगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी पालवे यांनी तक्रार केली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. खबऱ्याच्या माहितीवरून शेवगावमधील दरोड्यात राजू विनायक पगारे हा असल्याचे दिलीप पवार यांना समजले. त्यानुसार राजू याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने शेवगावमधील दरोड्याची माहिती दिली. यानुसार पोलिसांनी दरोड्यात वरील चौघांनी अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेने या पाच जणांना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)