निर्दयी मुलाने आईचा केला खून

नगर शहरातील घटना : वैद्यकीय उत्तरीय तपासणीत उलगडा

नगर – मुलानेच आईचा गळा दाबून खून केल्याची घटना नगर शहरात उघडकीस आली आहे. छाया बाळू गुंजाळ (वय 50) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आईचा खून केल्याच्या संशयावरून सागर बाळू गुंजाळ (रा. ऋषी सोसायटी, कल्याणरोड, नगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती उपनिरीक्षक रामेश्‍वरी पांढरे यांनी दिली.

खुनी सागर बाळू गुंजाळ व त्याची आई छाया हे कल्याण रोडवरील ऋषी सोसायटीमध्ये राहत होत्या. किरकोळ करणांवरून या मायलेकामध्ये वारंवार भांडण होत होते. ही भांडण पराकोटीची असायची. शुक्रवारी मध्यरात्री या मायलेकामध्ये भांडणे झाली होती. यातूनच बाळू याने रात्री झोपी गेलेल्या आईचा खून केला. यानंतर सकाळी आई उठली नाही म्हणून, त्याने आरडाओरडा केला. जिल्हा रुग्णालयात छाया यांची उत्तरीय तपासणी झाली. त्यात छाया यांचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे समोर आले आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच तसा अहवाल दिला आहे. तोफखाना पोलिसांना हा सर्व प्रकार संशयास्पद वाटला. गुंजाळ राहत असलेल्या आजूबाजूला चौकशी केल्यावर छाया आणि तिचा मुलगा सागर हेच दोघे घरात राहत होते. त्यांच्या नेहमीच वाद होत होते. हे वाद पराकोटीला जाऊन भांडणे ताणली जात होती. यातूनच काही प्रकार झाल्याचा संशय काहींनी पोलिसांच्या चौकशीत व्यक्त केला.

शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्‍वरी पांढरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सागर याला ताब्यात घेत त्याच्याकडे पांढरे यांनी चौकशी केली. सागर याने सुरूवातीला दिशाभूल करणारे उत्तरे दिली.

त्यावरून पांढरे यांचा संशय अधिकच बळावला. परंतु पांढरे यांच्या चौकशीसमोर सागर याने गुन्ह्याची माहिती दिली. सागर याची आई छाया यांच्याशी वाद झाले होते. त्यातून त्याने झोपेत असलेल्या आईचा गळा हाताने दाबून तिचा खून केला. सागर याला आईचा खून केल्याच्या संशयावरून पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयासमोर त्याला हजर केल्यानंतर सागर याला सोमवार (ता. 12) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)