हातचलाखीने महिलेचे सोने गंठण लांबवले

अकोले – आज राजूर अकोलेकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका महिलेची सोन्याचे गंठण चोरट्याने लांबवले. व अकोले पोलिसांना आपला हिसका दाखवला. या घटनेमुळे पुन्हा एकदा हातसफाई चोरांची असा चर्चेला विषय देवून गेली आहे.
आज सकाळी यमुनाबाई माधव भोर (रा.अंबड) या अकोले-अंबित या बसने आपल्या गावी जात होत्या. त्या बसमध्ये शिरल्यानंतर आपली सोन्याचे अडीच तोळे वजनाचे गंठण गळ्यात नाही असे लक्षात आले.

त्यानंतर सर्व प्रवाशांसह त्या अकोले पोलीस ठाण्यात गेल्या.तेथे तक्रार देण्यापूर्वी पोलिसांच्या ससेमिऱ्याला त्यांना सामोरे जावे लागले. जेव्हा श्रीमती भोर बसमध्ये चढत असताना हे गंठण चोराने हाथ सफाई दाखवून चोरले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी बसस्थान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला. पण वीज प्रवाह गुल असल्याने तो तपास थांबला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)