कोल्हार खुर्दमध्ये मटका अड्ड्यावर छापे

File Photo

पोलिसांची कारवाई तोकडी

गावातील अवैध व्यावसायिकांवर राहुरी पोलिसांनी केलेली कारवाई समाधानकारक असली तरी, ज्या प्रमाणात या गावात अवैध व्यावसायिकांचा जम बसलेला आहेत. त्या तुलनेत हि कारवाई फारच तोकडी आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून आपले बस्तान मांडून जुगार, मटका, आणि अवैध दारू विक्रीच्या माध्यमातून गरिबांचे संसार उघड्यावर आणणाऱ्या व्यावसायिकांवर खऱ्या अर्थाने कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत या कारवाईनंतर ग्रामस्थांमधून व्यक्त आहे.

कोल्हार खुर्द – राहुरी तालुक्‍यातील कोल्हार खुर्द गावात अचानक पोलीस पथकाने अवैध व्यवसायांवर छापा सत्र सुरू करून मटक्‍याच्या चिठ्ठ्यासह 2 हजार 530 रुपये रोख रकम जप्त केली. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

कोल्हार खुर्द येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध मटका, जुगार अड्ड्यासह अवैध दारू विक्रीचे व्यवसाय सर्रास स्थानिक प्रशासनाच्या डोळ्यासमोर सुरु होतो. हे व्यवसाय गावातून कायमचे हद्दपार करण्यासाठी स्थानिक प्रशासनावर नेहमीच ग्रामस्थांमधून दबाव टाकला जात होता.

मात्र, निर्ढावलेले अवैध व्यावसायिक कुणाच्याही दबावाला बळी न पडता व्यवसाय करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून प्रचंड नाराजी होती. अनेक वेळा गावातून पोलिसांच्या कर्तव्यावर देखील ग्रामस्थांमधून प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात आले. त्यामुळे एकंदरीतच या गावातील अवैध व्यावसायिकांवर अंकुश लावणे हे पोलिसांसमोर एक आव्हान होते.

मंगळवारी राहुरीचे पोलीस उपनिरिक्षक सतिष शिरसाठ यांच्यासह पो. कॉ. संजय राठोड, साहेबराव चव्हाण, शंकर रोकडे, रंगनाथ टाके, चालक ज्ञानेश्वर पथवे यांनी गावातील अवैध व्यवसायावर अचानक छापा टाकून मटक्‍याच्या चिठ्ठ्यासह रोख 2 हजार 530 रुपये जप्त केले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)