जबरी चोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक

नगर – मोटरसायकलवरून सर्वसामान्य जनतेला दमदाटी करून पैसे व मोबाईल जबरीने चोरी करणारा आरोपी अक्षय सुरेश गायकवाड (वय 23, रा. नंदनवन कॉलनी, बाल्होगाव) याला स्थानिक पोलीस शाखेने मोठ्या शिताफिने ताब्यात घेतला आहे. अक्षयविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, यांनी अक्षय गायकवाडला बोल्हेगाव परिसरातून अटक केली.
विजय ठोंबरे, रवींद्र कर्डिले, अशोक गुंजाळ, संदीप दरंदले, किरण जाधव या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)