नगर शहरातील घासगल्लीत गजाने मारामाऱ्या

नगर – किरकोळ कारणावरून घासगल्ली येथे एकाला पाच जणांनी लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्‍याने मारहाण केली आहे. अरशीयाय इकराम तांबटकर (वय 29, रा. शहराजी रोड, जुनी गल्ली) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

अदनान अंजुम तांबटकर, अरशान अंजुम तांबटकर, अंजुम नजीम तांबटकर, फैजान अंजुन तांबटकर, जिशाल अंजुम तांबटकर (सर्व रा. तांबटकर गल्ली, नगर) या पाच जणांविरोधात दंगा निर्माण केला म्हणून गुन्हा नोंदविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

किरकोळ करणावरून हा प्रकार झाला आहे. या दंग्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी अतिरीक्‍त बंदोबस्त देत परिसरातील तणाव नियंत्रणात आणला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)