रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यवसायिकाचे पाच लाख रुपये लुटले

जामखेड : येथील एका व्यवसायिकाला  अज्ञात चोरट्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पाच लाख पंधरा हजाराची रोख रक्कम लुटून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बलराम बन्सीलाल आहुजा (वय ४०) हे व्यापारी आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री 10. 45 वाजता दारूचे दुकान बंद करून मोटारसायकलवर घरी जात असताना गाडीवर दोन अनोळखी व्यक्ती आल्या व गाडीला गाडी अडवी लावून मागे बसलेल्या व्यक्तीने रिव्हॉल्वर काढून डोक्याला लावली व पाच लाख पंधरा हजार रुपये रोख रक्कम हिसकावून नेली व चोरटे पसार झाले. या गाडीला नंबर प्लेट नव्हती, असेही त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वारंवार अशा घटना घडत असल्याने शहरात भीतीचे वातावरणा आहे. दरम्यान, घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)