नुसत्या बघण्यावरून बोल्हेगावात दांडक्‍याने मारहाण

नगर – खुन्नसने का पाहतोस, असे म्हणत लाकडी दांडक्‍याने मारहाण करण्याचा प्रकार बोल्हेगाव येथे झाला आहे. चालक सुरज राजेंद्र मांडगे (रा. बोल्हेगाव) यांच्या फिर्यादीवरून शंकर दादा कराळे व त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बोल्हेगावच्या शंभुराजे चौकात हा प्रकार झाला. मांडगे हे तिथे असताना तु आमच्याकडे खुन्नसने का पाहतोस, कोणत्याही कारणावरून भांडणे करतोस, असे म्हणून शिवीगाळ केली. मांडगे यांनी यावर समोरच्यांना समजावले. त्यावर कराळे व त्यांच्या तीन साथीदारांनी मांडगे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

-Ads-

लाकडी दांडक्‍याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाण केल्यानंतर कराळे व त्याचे साथीदार तेथून निघून गेले. मांडगे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद झाली असून, तोफखाना पोलीस मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)