श्रीगोंदेत दोघांना लुटले

श्रीगोंदे – बेलवंडी बुद्रुककडे जाण्यासाठी श्रीगोंदे बाह्यवळण रस्त्यावर थांबलेल्या दोघांना चार अज्ञातांनी लुटल्याची घटना शनिवारी (दि.6) रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळापासून श्रीगोंदा पोलीस ठाणे काही मीटर अंतरावरच आहे, मात्र तरीही चोरी झाल्याने शहरातील चोऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तीन दिवसापुर्वीही शहरात घरफोडी झाली होती.

याबाबत ज्ञानेश पांडुरंग काळाणे (रा. बेलवंडी बुद्रुक) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ज्ञानेश काळाणे व त्यांचा चुलत भाऊ विशाल दत्तात्रय काळाणे हे दोघे शनिवारी रेल्वेने शिर्डीला गेले होते. सायंकाळी शिर्डीवरून आल्यानंतर ते श्रीगोंदा रेल्वे स्थानकावर उतरून वाहनाने श्रीगोंदे शहरात पोहचले.

बेलवंडी बुद्रुककडे जाण्यासाठी हे दोघे शहरालगतच्या बाह्यवळण रस्त्यावर उभे होते. रात्री अकरा वाजता चार अज्ञातांनी काळाणे बंधूंना ‘कुठे जायचे आहे?’ असे विचारून निघून गेले. मात्र ते चार इसम लगेच पळत माघारी आले. मारहाण आणि दमदाटी करून दोघांच्या खिशातील तीन हजार नऊशे रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि प्रत्येकी पाचशे रुपये रोख असा एकूण चार हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या झटापटीत ज्ञानेश व विशाल हे दोघे किरकोळ जखमी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)