बॅंक अधिकाऱ्याला कार्यालयात घुसून मारहाण

अकोळनेर येथे घडला प्रकार

नगर  – बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या अकोळनेर (ता. नगर) येथील शाखेत अधिकाऱ्याला दोघांनी कार्यालयात घुसून मारहाण केली आहे. शामबिहारी मोदी (रा. आनंदनगर, पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून आदेश बाळासाहेब शेळके व बाळासाहेब शेळके (दोघे रा. अकोळनेर) यांच्याविरोधात नगर तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

-Ads-

इंटरनेटची सेवा विस्कळीत बॅंकेची प्रणाली वारंवार खंडीत होत होती. त्यामुळे मोदी यांना बॅंक शाखेत काम करताना अडथळे येत होते. त्यावेळी शेळके हे तिथे आले आणि आमचे पैसे का भरले नाही, अशी विचारणा करू लागले. मोदी यांनी त्यावर या दोघांना नेट प्रॉब्लेम असल्याने अडथळे येत आहे. नेट प्रॉब्लेम दूर झाल्यावर तुमचे पैसे तत्काळ भरून घेतो, असे सांगितले. त्यावर शेळकेंनी मोदी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

चापटीने मारहाण करत मोदी यांना खाली पाडून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण सुरू केली. बॅंकेच्या शाखेत हा प्रकार झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. आजूबाजूच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतल्यानंतर या मारामाऱ्या सोडविण्यात आल्या. मोदी यांनी नगर तालुका पोलिसांकडे झालेल्या मारहाणीबाबत आणि धमकीबद्दल तक्रार केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)