बाबुर्डीत घरफोडी; बाप-लेकास जबर मारहाण

सहा हजारांचा ऐवज लांबवला

सुपे – पारनेर तालुक्‍यातील बाबुर्डी येथील दिवटे वस्तीवर गुरुवारी पहाटे 3 वाजता अज्ञात तीन चोरट्यांनी घरफोडी करून पाच हजार रुपये रोख व मोबाईल असा पाच हजार आठशे रुपयाचा ऐवज चोरून नेला. या दरम्यान बाप, लेकाला लाकडी दांडक्‍याने मारहान करून जबर जखमी केल्याप्रकरणी तीन अज्ञात चोरांविरोधात सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, वडील चंद्रभान दिवटे, आई झुंबरबाई दिवटे व मुलगा दीपक हे बाबुर्डी येथील दिवटे वस्तीवर राहतात. चंद्रभान दिवटे व दीपक हे घरात झोपले होते, व आई झुंबरबाई दिवटे या नवीन घराचे बांधकाम चालू आहे, त्या ठिकाणी सामानाची देखभाल करण्याकरीता झोपण्यास गेल्या होत्या.

रात्री 3 वाजेच्या सुमारास त्यांना आवाज आला म्हणून दीपकने घराचा दरवाजा उघडला असता, अचानक तिघे चोरटे त्यांच्या घरात घुसले. तुमच्या जवळचे सर्व सोने व पैसे जे काही असेल ते आम्हाला काढून द्या, चोरट्यांच्या आवाजाने चंद्रभान दिवटे हे देखील उठले असता त्यातील एकाने सोबत आनलेल्या लाकडी दांडक्‍याने त्यांच्या पाठीत, छातीवर, उजव्या व डाव्या खांद्यावर मारले, त्यांच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने ते बेशुद्ध पडले.

घटनेचा पुढील तपास सुपे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजयकुमार सोने हे करीत आहेत. दरम्यान सुपे परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, चोर जबर मारहाण करत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास लावावा तसेच रात्रीची गस्त घालावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)