फसवणूक बनावट खरेदीखत करणाऱ्या सहा जणांवर गुन्हे

नगर  – खरेदीखतासाठी तोतया उभा करून दस्ताऐवज करणाऱ्या पाच जणांविरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अश्‍पाक अख्तर शेख (वय 38, रा. गौतमनगर, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. शाहरूख आसीफ शेख (वय 32, मोमीनगल्ली, भिंगार), सय्यद वसीम आयुब (रा. नगर), रियाज खान (रा. गोविंदपुरा), अफसर रियाज खान (वय 25, रा. बाबाबंगाली, नगर), असीर मोहमंद हुसेन शेख (वय 36, रा. श्रीरामपूर) व एक अनोळखी व्यक्ती अशा सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अश्‍पाक शेख यांची नागरदेवळे (ता. नगर) येथे जमीन आहे. प्लॉट नंबर 71 मधील 194.36 चौरसमीटर एवढ्या क्षेत्रफळापैकी 98.18 चौरसमीटर प्लॉट हा अश्‍पाक शेख यांच्या ऐवजी वरील सहा जणांनी तोतया व्यक्ती उभा करून त्याचे खरेदीखत केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भिंगारचा शाहरूख शेख याने हे खरेदीखत दस्त क्रमांक 109/ 2017 अन्वये खरेदी करून त्यावर साक्षीदार म्हणून सय्यद आयुब व रियाज खान यांच्या सह्या घेतल्या. अफसर खान व असीर शेख यांनी शहारूख शेख यांची ओळख देत खरेदीखतावर स्वाक्षरी केल्या. बनावट खरेदीखत दस्त करन फसवणूक केल्याचे अश्‍पाक शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)