नगर मनपा निवडणूक 2018 : आघाडीपूर्वी राष्ट्रवादीतर्फे इच्छुकांच्या मुलाखती

नगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी (ता. 12) घेणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांनी दिली. पक्षाचे निवडणूक निरीक्षक अंकुश काकडे, आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादा कळमकर, आमदार संग्राम जगताप व प्रदेश सरचिटणीस अंबादास गारूडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखती होतील.

नगर-पुणे रोडवरील केडगाव येथील राष्ट्रवादी भवन येथे सकाळी अकरा वाजल्यापासून या मुलाखती सुरू होतील. अभिजीत खोसे, सुरेश बनसोडे, रेश्‍मा आठरे, अमित खामकर, साधना बोरूडे, साहेबान जहागिरदार, वैभव ढाकणे, ज्ञानेश्‍वर कापडे, ऍड. योगेश नेमाणे, महेश बुचडे, भरत गारूडकर, अंजली आव्हाड हे पदाधिकारी या मुलाखतींसाठी प्रामुख्याने उपस्थित राहतील. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णयासाठी 14 तारखेला मुंबईत वरिष्ठ नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने मुलाखती ठेवल्या आहेत.

-Ads-

या मुलाखतीनिमित्ताने उमेदवारांची यादी निश्‍चित करून आघाडीच्या बैठकीत निर्णायक मुद्दा घेण्याची तयारी राष्ट्रवादीने केल्याने सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे. आमदार जगताप या दुहीमुळे शहरात राष्ट्रवादीचे पारडे कॉंग्रेसपेक्षा निश्‍चितच जड आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने निश्‍चित केलेल्या “प्लस’च्या दिशेने हे पाऊल असल्याचे दिसते आहे.

कॉंग्रेसकडून आघाडीचा प्रस्ताव आहे. राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या भागात कॉंग्रेस उमेदवारीसाठी दावा सांगत आहे. त्यातच कॉंग्रेसमध्ये दुफळी आहे. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू नका, असे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे आघाडीच्या निर्णयाची वाट पाहण्यापेक्षा राष्ट्रवादीने मुलाखतींची तयारी सुरू केल्याचे दिसते आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)