‘नगरपालिकांच्या प्रश्‍नांसाठी पाठपुरावा’

नगर – जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या विकास कामांचा निधी परत जाणार किंवा अखर्चित राहिला आहे. त्याचा सविस्तर प्रस्ताव नगरपालिका प्रशासनाने द्यावा. यासंदर्भात निश्‍चितपणे राज्यशासन स्तरावर नगरविकास विभागाकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करु, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या विविध विकास निधी प्रशासकीय मंजुरीबाबतची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यावेळी उपस्थित होते. या बैठकीला नगरपालिका, नगरपंचायतींचे अध्यक्ष, मुख्याधिकारी उपस्थित होते.

यावेळी नगरपालिकांसाठी येणारे अनुदान, विविध कामांसाठी नगरपालिकांनी पाठविलेले प्रस्ताव, प्रस्तावांची सद्यस्थितीचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. नगरपालिकांचे जे प्रश्न आहेत, त्यांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करु. मात्र, नगरपालिका आणि नगरपंचायतीनीही त्यांना प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करणे आवश्‍यक आहे. मिळालेल्या निधीचा योग्य विनियोग करण्याच्या अनुषंगाने आवश्‍यक त्या प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता घेणे याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे. त्यांनी त्यासाठी पाठपुरावा करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

नगरपालिकांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याबाबत विकासकामांसाठी आवश्‍यक तो निधी निश्‍चितपणे उपलब्ध करुन दिला जाईल, असे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले. नगरपालिकांना जाणवणारे अपुरे कर्मचारी मनुष्यबळासंदर्भात तसेच निधी संदर्भात पाठपुरावा करु.

नगरपालिकांनीही कामांचा दर्जा आणि गुणवत्ता टिकवून ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी नगरपालिकेचे अध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. नव्याने निर्माण झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने विकासकामांना त्याचा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)