प्रभाग रचनेसंदर्भात मनपाला न्यायालयाची नोटीस

नगर – महापालिकेच्या प्रभाग रचनेला आव्हान देणारी याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेतली असून, जिल्हा प्रशासन, मनपा आणि सरकारला नोटिसा काढल्या आहेत. नीसार बाटलीवाला (पवार) यांनी ही याचिका दाखल केली होती. पुढील सुनावणी 16 ऑक्‍टोबरला होणार आहे. प्रभाग रचनेसंदर्भातील अन्य याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

बाटलीवाला यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. कॅटोन्मेंट बोर्डाचा काही भाग प्रभाग रचनेत दाखविला असल्याकडे या याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. याचिकेत प्रभाग 11 व 12 मधील मतदारांचा मनपा हद्दीत समावेश केला आहे. सर्जेपुरा कैलारू, कोठला झोपडपट्टी ते नगर महाविद्यालयापर्यंतच्या भागाचा समावेश आहे. सुमारे 52 एकरावरील घरांचे उतारे कॅटोन्मेंट बोर्डाकडे आहेत. या जागाचे हस्तांतर महापालिकडे झालेले नाही. तरीही त्याचा उल्लेख महापालिका हद्दीत होत आला आहे.

-Ads-

मनपाच्या नव्या प्रभाग रचनेतही त्याचा सहभाग करण्यात आला आहे. हा परिसर पूर्णपणे प्रभाग रचनेतून वगळावा, अशी मागणी बाटलीवाला यांनी याचिकेद्वारे मागणी केली आहे. न्यायाधीश आर. एम. बोर्डे व मंगेश पाटील यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी सुरू आहे. ऍड. संदीप आंधळे हे बाटलीवाला यांच्यावतीने युक्तिवाद करत आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 16 ऑक्‍टोबरला होणार आहे.

80 हजार मतदार कोणाचे?

नीसार बाटलीवाला यांच्या याचिकेवर न्यायालयाने ग्राह्य धरल्यास सुमारे 80 हजार मतदारांना वगळावे लागले. परंतु हे मतदार अनेक वर्षापासून महापालिकेकडेच मतदान करत आले आहे. ही याचिकाच हे मतदार नगरचे की कॅंटोन्मेट बोर्डाचे हे ठरवले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)