नगर : स्थायी, महिला व बालकल्याणवर शिवसेना

आता सभापतीपदासाठी होणार चुरस

नगर – महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती व महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य निवडीत शिवसेनेचे वर्चस्व राहिले. प्रत्येकी 16 सदस्यांच्या जागांपैकी सहा जागा शिवसेनेकडे आल्या आहे. शिवसेना व भाजप युती होण्याची अपेक्षा होती. परंतू महापौर निवडीच्यावेळी झालेली भाजप व राष्ट्रवादीची (बडतर्फ नगरसेवक)अभ्रद युती या सदस्य निवडीच्यावेळी दिसत आली.त्यामुळे आता स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी चांगलीच चुरस होण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत महापालिकेच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीच्या प्रत्येकी 16 सदस्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व बसपाच्या गटनेत्यांनी दिलेल्या नावानुसार या नियुक्‍त्या करण्यात आल्या. भाजपच्या गटनेत्या उपमहापौर मालन ढोणे, राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर, कॉंग्रेसच्या सुप्रिया जाधव, शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे व बसपचे मुदस्सर शेख यांनी बंद पाकीटात सदस्यांची नावे दिली. त्यानंतर महापौर वाकळे यांनी ही नावे वाचून जाहिर केली.

स्थायी समिती सदस्य – आशा कराळे, सोनाली चितळे, मनोज कोतकर (भाजप). अविनाश घुले, गणेश भोसले, दीपाली बारस्कर, कुमार वाकळे, शोभा बोरकर (राष्ट्रवादी). योगीराज गाडे, गणेश कवडे, सुभाष लोंढे, अमोल येवले, सुवर्णा जाधव, विद्या खैरे (शिवसेना). संध्या पवार (कॉंग्रेस). मुदस्सर शेख (बसपा)

महिला बालकल्याण समिती सदस्य- लता शेळके, गौरी नन्नावरे, सोनाबाई शिंदे (भाजप). ज्योती गाडे, मीना चव्हाण, परवीन कुरेशी, मीना चोपडा, शोभा बोरकर (राष्ट्रवादी). सुवर्णा गेनप्पा, रिता भाकरे, कमल सप्रे, पुष्पा बोरुडे, सुनीता कोतकर, सुनीता लोखंडे (शिवसेना). रिझवाना शेख (कॉंग्रेस). अनिता पंजाबी(बसपा).

या सभेत सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी शहिद जवानांना श्रद्धाजंली वाहून एक महिन्याचे मानधन शहिद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय जाहिर केला. यावेळी अनिल शिंदे यांनी महापौरांनी तातडीने अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी महासभा बोलविण्याचा आग्रह धरला. गेल्या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक खर्च झाले नाही. प्रशासनाने 50 टक्‍के ते खर्च केले. आताही प्रशासन कामे नको म्हणून अंदाजपत्रक मंजूर करण्यास विलंब लावणार आहे. लोकसभा आचारसंहितेपूर्ण अंदाजपत्रक मंजूर करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)