बदलीच्या कारणावरून मनपा कर्मचाऱ्यांमध्ये मारहाण

नगर – बदली होण्यास कारणीभूत ठरला म्हणून महापालिकेचे कर्मचारी बाळू विधाते यांना दोघांना मारहाण केली. महापालिकेतील सफाई कामगार व त्याचा मुलगा याने ही मारहाण केली आहे. लोखंडी पाईप व बुलेटची लोखंडी साखळीने विधाते यांना मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सिद्धार्थनगर येथील करंदीकर हॉस्पिटलजवळ हा प्रकार झाला.

महापालिकेतील सफाई कामगार गुलाब राजाराम गाडे याची नेहमीच्या ठिकाणावरून बदली झाली. ही बदली बाळू विधाते यांच्यामुळे झाल्याचा समज गाडे याने करून घेतला. त्याचा राग धरून गाडे व त्याचा मुलगा याने विधाते याला लोखंडी पाईप व बुलेटच्या साखळीने मारहाण केली.

-Ads-

या मारहाणीत विधाते हे जखमी झाले आहेत. या मारहाणीत विधाते यांचा मोबाईल व दोन हजार रुपये गहाळ झाले आहेत. तोफखाना पोलिसांनी विधाते यांच्या फिर्यादीवरून गाडे व त्याच्या मुलाविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)