कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची निरीक्षकांशी खडाजंगी

मध्यस्थीनंतर वादावर पडदा; आघाडीबाबतही मतैक्‍याचा अभाव

आघाडीचा निर्णय 30 ऑक्‍टोबरला

या बैठकीतील अहवालावर राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करायची, की नाही याचा निर्णय मुंबई येथे 30 ऑक्‍टोबरला होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत शहरातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार आहे. कॉंग्रेस पक्षाने निवडणुकीचे अर्ज वितरणालादेखील सुरुवात केली आहे. इच्छुकांकडून किती अर्ज घेतले जातात, हादेखील आघाडीसाठी महत्त्वपूर्ण मुद्दा राहणार आहे. उबेद शेख यांनी आघाडीला विरोध कायम ठेवला आहे. निखिल वारे, बाळासाहेब भंडारी, बाळासाहेब भुजबळ आणि मंगल भुजबळ यांनी आघाडी व्हावी, अशी सूचना या बैठकीत मांडली आहे.

नगर – महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आढावा घेण्यासाठी आलेल्या कॉंग्रेसच्या पक्ष निरीक्षकांशी कार्यकर्त्यांची खडाजंगी झाली. पक्षनिष्ठेबाबत निरीक्षकांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना चिमटा घेतल्यावर हा प्रकार झाला. पदाधिकाऱ्यांच्या आक्रमकतेसमोर निरीक्षकांना चांगलाच घाम फुटला होता. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यावर मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला.
कॉंग्रेसचे निरीक्षक शाम उमळकर यांच्या उपस्थित आज शासकीय विश्रामगृहावर महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक झाली.

-Ads-

प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष निखिल वारे, नगरसेवक जयश्री सोनवणे, नगरसेवक फैय्याज शेख, सरचिटणीस उबेद शेख, बाळासाहेब भंडारी, बाळासाहेब भुजबळ, मंगल भुजबळ, गौरव ढोणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. उमळकर यांनी बैठकीच्या सुरुवातीपासून पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्‍न उपस्थित करायला सुरुवात केली होती. महापौरपदाच्या निवडीच्यावेळी एकच नगसेवक पक्षाशी निष्ठ राहिला, असा टोला त्यांनी बैठकीत लगावला.

उमळकर यांच्या या विधानावर वारे व शेख यांनी जोरदार आक्षेप घेतला. बैठकीत बसलेले पदाधिकारी उभे राहून निरीक्षकांशी वाद घालू लागले. शेख, चव्हाण आदींनी संयमाची भूमिका घेतली. वारे आणि शेख आक्रमक राहिले. उमळकर यांनी शेवटी आपले विधान मागे घेतले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आक्रमकपणामुळे उमळकर यांना पंख्याखाली घाम फुटला होता. तोपर्यंत नगरच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीविषयी भूमिका विशद केली.

महात्मा गांधी जयंतीपासून नगर शहर कॉंग्रेस कमिटीमध्ये वाद सुरू आहेत. या वादामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना जनसंघर्ष यात्रेचा समारोप नगर शहराऐवजी पाथर्डीला करावा लागला. प्रदेशाध्यक्ष, खा. अशोक चव्हाण शहरात जनसंघर्ष यात्रेचा रथ घेऊन आल्यानंतर ही तिथे गटबाजी उफाळून आली होती.

दीप चव्हाण यांनी महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचाच महापौर असेल, अशी ग्वाही या यात्रेत दिली होती. त्याचाच धागा पकडून अशोक चव्हाण यांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षनिरीक्षकांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पाठविले होते. या बैठकीला दोन पक्षनिरीक्षक येणार होते. त्यातील एकानेच हजेरी लावली. त्यातही पक्षनिरीक्षकांची आणि पदाधिकाऱ्यांचे वाद झाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)