घुले महाविद्यालयाचा कबड्डी संघ विजेता 

file photo

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत मुलींची चमकदार कामिगिरी

भावीनिमगाव – शेवगाव तालुक्‍यातील दहिगाव ने येथील लोकनेते मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करीत आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नुकत्याच आनंद महाविद्यालय पाथर्डी येथे पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय संघास 20 गुणाने पराभूत करून हा संघ विजेता ठरला. याआधी 2016-17 या वर्षी अभियांत्रिकी महाविद्यालय सारोळाबद्धि येथे व 2017-18 मध्येही सी. डी. जैन कॉलेज श्रीरामपूर येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत मुलींचा संघ विजेता ठरला होता.

विजेत्या संघातील रिंकल नवथर, अश्विनी पवार, रेणुका मिसाळ व शितल घुंगासे या चार खेळाडूंची इंदापूर येथे होणाऱ्या विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. विजेते संघातील खेळाडूंना प्रा. बाळासाहेब साबळे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले पाटील, सचिव चंद्रशेखर घुले पाटील, प्राचार्य डॉ. डी. एन वाबळे, प्रशासकीय अधिकारी के. के. पवार, क्रीडा शिक्षक शिवाजी आव्हाड व शिवाजी वाबळे, प्रा. आप्पासाहेब खंडागळे, प्रा. महेश शेजुळ, सेवा सोसायटी उपाध्यक्ष बाळासाहेब मरकड आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)