अवकाळीची भीती @ नऊ डिसेंबर पर्यंत!

संग्रहित छायाचित्र

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्‍यता

अवकाळीच्या भीतीबरोबर थंडीच्या लाटेची शक्‍यता

पूर्वेकडून येणाऱ्या वारे वाहत आहेत. त्यामुळे ढग एकाच ठिकाणी जमा होत आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे गारठा जाणवतो आहे. सायंकाळी गारठ्याची तीव्रता वाढली आहे. ढगाळ वातावरणाबरोबर वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहणार आहे. उत्तरेबरोबरच ईशान्येकडूनही थंड वारे वेगाने वाहत आहेत. त्यामुळे राज्यात थंडी वाढण्याची शक्‍यता आहे.

नगर – मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने नऊ डिसेंबरपर्यंत अवकाळीची शक्‍यता वर्तवली आहे. राज्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तापमानात विचित्र प्रकारे चढ-उतार जाणवत आहेत. या वातावरणात देखील गारठा टिकून आहे. तरी देखील अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

-Ads-

वातावरणातील बदलाची सर्वात अगोदर नोंद नगरमध्ये झाली आहे. नगरमध्ये सोमवारी सर्वात नीचांकी तापमान नोंदविले गेले आहे. किमान पारा 10.5 अंश सेल्सिअसवर होता. बुधवारी हाच पारा किमान 15.8 अंश सेल्सिअस एवढा नोंदविला गेला. राज्यात बुधवारी सर्वात नीचांकी पारा नागपूरचा होता. तो 14.5 अंश सेल्सिअस एवढा होता.

गेल्या चोवीस तासांत राज्यातील प्रमुख ठिकाणी नोंदविलेले तापमान (अंश सेल्सिअस) पुढीलप्रमाणे- मुंबई (कुलाबा) 23.5, सांताक्रूझ 21.2, अलिबाग 22.2, रत्नागिरी 21.5, पुणे 16.9, जळगाव 14.6, कोल्हापूर 19.7, महाबळेश्वर 15.4, नाशिक 14.6, सातारा 16.9, सोलापूर 19.6, औरंगाबाद 15.4, परभणी 16.5, अकोला 16.5, अमरावती 15.6, बुलढाणा 17.4, चंद्रपूर 18.2, गोंदिया 15.3, नागपूर 14.5, वर्धा आणि यवतमाळ 17.0.

ढगाळ वातावरणाबरोबर अवकाळीची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयासह काही भागांमध्ये आठ डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. नऊ डिसेंबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावासाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि तापमानातील वेगवान चढ-उतारांमुळे पीकांवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या आजारांनी डोकेवर काढले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
2 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
2 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)