शहरातून होणार ३३१ जण हद्दपार, आठ जण तडीपार

शहर पोलिसांकडून प्रस्ताव तयार : विसर्जन मार्गावर 116 सीसीटीव्ही बसविणार

नगर – मोहरम आणि गणेश उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी शहरातील अपप्रवृत्तींना प्रतिंबध करण्यासाठी कंबर कसली आहे. उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून, शहरातून सुमारे 331 जणांना हद्दपार, तर आठ जणांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्याची तयारी केली आहे. कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅंप पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई होणार आहे.

मोहरम आणि गणेश उत्सव यावर्षी एकत्र साजरे होत आहे. हे सण शांततेत पार पाडण्यासाठी नगर शहर पोलीस प्रयत्नांची शर्यत करत आहे. प्रत्येक पातळीवर काळजी घेत आहेत. विविध उपाययोजना करत आहेत. स्थानिक पोलीस ठाण्याकडून वारंवार अपडेट घेण्यात आहे. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी स्थानिक पोलीस ठाण्यांनी नोटिसा बजविण्यास सुरूवात केली आहे. ही कारवाईत कोणत्याही प्रकारची शिथिलता न ठेवण्याच्या सूचना शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिल्या आहेत.

शहरात मोहरम आणि गणेश उत्सवाच्या मिरवणुकीचा ताण आहे. पोलिसांनी त्यानुसार मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली आहे. या मार्गावर प्रभावी नजर राहावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची तयारी केली आहे. कोतवालीने 54 आणि तोफखाना पोलिसांनी 86 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज व्यक्त केली आहे. भिंगार कॅंप पोलिसांनी 20 कॅमेऱ्यांचा प्रस्ताव दिला आहे. त्यात कॅंटोन्मेंट बोर्डाकडे भिंगार वेस आणि गवळीवाडा येथे सात कॅमेरे बसविण्याची शिफारस केली आहे.

कोतवाली, तोफखाना व भिंगार पोलिसांनी उत्सवाच्या काळात उपद्रव दाखविणाऱ्या अपप्रवृत्तींना प्रतिबंध करण्यासाठी हद्दपारीचे प्रस्ताव करण्यास सूचना केल्या आहेत. या स्थानिक पोलीस ठाण्यांनी तसे प्रस्ताव सुरू केले आहे. प्रस्तावाची माहिती काहींनी मिळाल्यानंतर राजकीय दबाव आणण्यास सुरूवात केली आहे. परंतु पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करत राहण्याच्या सूचना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पोलीस ठाणे, प्रस्तावित हद्दपार, तडीपार, प्रतिबंधात्मक, स्थानबद्ध, सीसीटीव्ही
कोतवाली : 123, 02, 205, 15, 54
तोफखाना : 111, 0, 400, 18, 86
भिंगार : 94, 6, 170, 02, 20

शहरातील दारूवरील कारवाई
जुगार : 269
दारूबंदी : 284

“उत्सवाच्या काळात शहरातील अपप्रवृत्तींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जुळवाजुळव अंतिम टप्प्यात आहे. कॅमेरे बसविण्याची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल. प्रतिबंधात्मक, हद्दपार, स्थानबद्ध, दोन वर्षांसाठी तडीपार करण्याच्या प्रस्तावांवर काम देखील सुरू झाले आहे. दोन दिवसांत ही कारवाई पूर्ण होईल. अतिरीक्त पोलीस बंदोबस्तासाठी वरिष्ठांशी संपर्क साधून आहे. तो देखील लवकरच उपलब्ध होणार आहे. सण-उत्सवाच्या काळात जुगार आणि दारूंच्या अड्ड्यांपासून अपप्रवृत्तींना सुरूवात होते. त्यामुळे जुगार आणि दारूबंदीवर कारवाई सुरूच राहिल. हद्दपारीचा भंग करण्यांविरोधात फौजदारी कारवाईच्या सूचना स्थानिक पोलिसांनी दिल्या आहेत.
– संदीप मिटके, शहर पोलीस उपअधीक्षक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)