शहर बससेवा दीड महिन्यांनी धावणार

नव्या बसगाड्याच्या प्रतीक्षेमुळे बससेवा रखडली

नगर – शहर बससेवेसाठी दीपाली ट्रान्सपोर्ट संस्थेची निविदा मंजूर करताना 2018 मधील नवीन बसगाड्या असतील, तरच नुकसान भरपाईचे अनुदान देण्याचा निर्णय स्थायी समिती सभेत घेतला आहे. त्यामुळे अभिकर्त्याने नव्याने बसगाड्याची मागणी नोंदविली असून 60 दिवसांनी या गाड्या येणार आह. त्यामुळे नगरकरांना शहर बससेवा सुरू होण्यासाठी आणखी दीड महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. अभिकर्त्याने नव्याने 15 गाड्या मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात 4 ऑगस्टला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दीपाली ट्रान्सपोर्ट या संस्थेला शहरबससेवा चालविण्याचा ठेका देण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. आधीच प्रशासकीय दिरंगाईमुळे स्थायी समितीमध्ये हा विषय येण्यास साडेतीन महिने लागले. आता विषय मंजुर झाला तर नव्या बसगाड्यांचा मुद्दा उपस्थित झाला आहे. अर्थात प्रशासकीयपातळीवर कासवाच्या गतीने काम चालू आहे. स्थायीने मंजुरी दिल्याने अन्य सोपस्कार पूर्ण करून अभिकर्त्यांस कार्यारंभाचे आदेश देणे आवश्‍यक आहे. परंतू ज्या अधिकाऱ्यांवर या सेवेची जबाबदारी आहे. ते आपलाला काही देणे घेणे नाही अशाच अवेशात असल्याने मंजुरीनंतरचे सर्व सोपस्कार देखील ठप्प झाले आहे. त्यामुळे अभिकर्त्यांला मुदत मिळाली आहे. यासर्वच दिरंगाईमुळे शहर बससेवा सुरू होण्यास आणखी किती दिवस वाट पहावी लागणार असा प्रश्न नगरकरांना पडला आहे.

यापूर्वीचा अभिकर्ता यशवंत ऑटो या संस्थेची बससेवा बंद करण्यात आली होती. नव्याने 17 एप्रिलला निविदा मागवण्यात आल्या होत्या. बसगाड्या मोडकळीस आल्या असल्याने तत्कालीन स्थायी समितीने नवीन निविदा काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. या प्रक्रियेत दीपाली ट्रान्सपोर्ट 2 हजार 25, गाडे ट्रान्सपोर्ट 1 हजार 525 तर वाही ट्रान्सपोर्ट कंपनीने 1 हजार 336 रुपये दरमहा प्रतिबस याप्रमाणे स्वामित्वधन देण्याची तयारी दर्शवली होती. त्यात सर्वाधिक 2 हजार 25 रुपये स्वामित्वधन देणाऱ्या दीपाली ट्रान्सपोर्टबरोबर 8 जूनला वाटाघाटी होऊन स्वामित्वधन 2 हजार 200 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. हा विषय स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. त्याला मंजुरी देताना सभापती बाबासाहेब वाकळे यांनी नवीन बस व चांगली सेवा द्यावी, जुन्या बसला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नका, असे स्पष्ट आदेश देऊन ठरावाला मंजुरी दिली.

मोठ्या प्रतीक्षेनंतर शहर बससेवेचा विषय मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर पोहोचला होता. ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतरही आता पुढील कार्यवाहीसाठी दिरंगाई केली जात आहे. स्थायी समितीमध्ये मंजुरी मिळून आता एक महिना होईल तरी शहर बस धावत नाही. त्यामुळे महापालिकेच्या कारभारवर प्रश्‍न चिन्ह उभे राहत आहे. त्यात नव्या बसगाड्याच अभिकर्त्याने वापराव्यात असा ठराव करण्यात आल्याने अभिकर्त्याने नव्या बसगाड्यांची मागणी संबंधित कंपनीकडे नोंदविली आहे.

मागणी नोंदविल्यानंतर 60 दिवसांनी गाड्या उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अजून महिना- दीड महिना तरी नव्या गाड्या उपलब्ध होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही सेवा सुरू होण्यास तेवढाच कालावधी लागणार आहे.
गेल्या साडेचार महिन्यांपासून ही सेवा बंद असल्याने नगरकरांचे हाल होत आहे. रिक्षाचालकांची मनमानी सहन करावी लागत असून जास्तीचे भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी नगरकरांकडून होत आहे.

प्रभारी आयुक्‍तांचा दरारा संपला

गेल्या चारसाडे महिन्यांपासून नगरकरांना शहरबससेवाची प्रतीक्षा आहे. परंतू महापालिकेचे कामकाज “सरकारी काम अन्‌ सहा महिने थांब’ या पद्धतीने चालू आहे. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी आल्यानंतर महापालिकेचे कामकाजात बदल झाला असल्याचे वाटले होते. परंतू शहर बससेवेचा ठेका मंजुर झाल्यानंतर महिला लोटला तरी अद्यापही कार्यारंभाचे आदेश दिले जात नाही. त्यामुळे प्रभारी आयुक्‍तांचा दरारा संपला की काय अशी शंका व्यक्‍त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)