मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी चिचोंडी सज्ज

विविध विकासकामांचे आज भूमिपूजन : ठिकठिकाणी स्वागत कमानी

पाथर्डी  – राष्ट्रसंत आनंदऋषिजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र चिचोंडी (ता.पाथर्डी) येथे शुक्रवारी सकाळी 11 वाजता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे. येथे त्या प्रथमच येत असल्याने आमदार शिवाजी कर्डिले यांनी स्वागताची जोरदार तयारी केली आहे. गावागावात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून मंत्री मुंडे यांच्या स्वागतासाठी चिचोंडी गाव सज्ज झाले आहे.

मुंडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. विकास निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचेही मोठे सहकार्य लाभले आहे. प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, ज्येष्ठ नेते सुभाषराव पाटील, युवा नेते अक्षय कर्डिले आदींसह मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.

आमदार कर्डिले आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे 1995 सालापासून मैत्रीपूर्ण संबंध होते. मंत्री पंकजा मुंडे यांनीही कर्डिले-मुंडे यांच्या कौटुंबिक संबंधाची जाहीरपणे कबुली दिली. दोन्ही कुटूंबाचा ऋणानुबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्री मुंडे या चिचोंडी शिराळ भागात प्रथमच येत आहेत. त्यांच्या आगमनाची उत्सुकता या परिसरातील सर्वसामान्य जनतेला लागलेली आहे. मुंडे यांनीही आमदार मोनिका राजळे आणि आमदार शिवाजी कर्डिले यांना भरीव विकास निधी देत पाठबळ देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)