छगन भुजबळांना धमकी देणाऱ्यास अटकेची मागणी

राहुरी : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना नुकतेच धमकीचे पत्र मिळाले. या घटनेचा समता परिषदेतर्फे निषेध करून नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. भुजबळ यांना समाजविघातक व भीमा कोरेगाव दंगलीमध्ये सहभागी असलेले मनोहर भिडे समर्थकाने जिवे मारण्याचीधमकी देणारे पत्र पाठवले आहे. या पत्रात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐकेरी ऊल्लेख केल्याने बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

भुजबळ बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी राज्यासह देशभरात फिरत आहेत. याचाच धसका घेऊन मनुवादी व्यक्तींनी भुजबळ यांना धमकीचे निनावी पत्र पाठवले आहे. या संदर्भात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने राहुरीच्या नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याप्रसंगी मच्छिंद्र गुलदगड, प्रशांत शिंदे, संतोष आघाव, कांतिलाल जगधने, संजय संसारे, मच्छिंद्र गुंड, संतोष वाघमारे, अशोक तुपे, अब्दुल आतार, सचिन पवार, राजेंद्र खोजे, अमर सातोरे, विश्‍वास जगधने, सतीश फुलसौंदर, राजू दाभाडे, जालिंदर घिगे, शरद संसारे, माधव बिडवे, अमजद पठाण, बाबा साठे, दिलीप चौधरी, रोहित तेलतुंबडे, प्रसाद कोरडे, शुभम घाडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)