अकोलेत छात्रभारती विद्यार्थी संघटनेचा मोर्चा

अकोले – अकोले तालुक्‍यातील विद्यार्थ्यांची फी माफ करा, तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना एसटी प्रवास माफ करा, व तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करा, या मागण्यांसाठी अकोले तालुका छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व डॉ. संदीप कडलग यांनी केले.

निवेदनात म्हटले आहे की, अकोले तालुक्‍यात दुष्काळाची तीव्रता भयानक रूप धारण करीत आहे. बाहेर गावाहून शिक्षणासाठी अकोले व इतरत्र जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीचा पास काढणेदेखील कठीण झाले आहे. अशातच तालुका दुष्काळी जाहीर न झाल्याने तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना एसटी सवलतीचा पास मिळणार नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आज हा मोर्चा काढून छात्र भारतीने सर्वाचे लक्ष वेधले.

गावातून काढण्यात आलेल्या मोर्चातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन घोषणाही दिल्या. त्यात अकोले तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना एसटी पास मोफत मिळावा, शैक्षणिक फी माफ करावी, अकोले तालुका संपूर्ण दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, दुष्काळ निर्मूलनासाठी त्वरित अंमल बजावणी करावी अशा मागण्या करण्यात आल्या, मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल असा इशारा त्यांनी दिला डॉ. कडलग यांनी दिला.

यावेळी अमोल आरोटे व विशाल पगारे याचेहीभाषण झाले. छात्र भारती व राष्ट्र सेवा दलाच्यावतीने नायब तहसीलदार जगदीश गाडे, अकोले एसटीचे आगारप्रमुख महामंडळ अकोले यांना निवेदन देण्यात आले, याबाबत आठ दिवसांत निर्णय न झाल्यास तालुक्‍यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा, छात्र भारती व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनावर डॉ. संदीप कडलग, लक्ष्मण आव्हाड, सुभान शेख, नारायण एखंडे, अनिल शेटे, अमोल आरोटे, विशाल पगारे, पुष्पलता चासकर, बजरंग जेडगुले यांचेसह अनेक विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)