रस्त्यांसाठी कोल्हेंची मंत्र्यांकडे दहा कोटींची मागणी

कोपरगाव-शिर्डी येथील दौऱ्यात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रस्त्याच्या कामाबाबत निवेदन देताना आमदार स्नेहलता कोल्हे.

कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची कामे विशेष दुरुस्ती अंतर्गत मंजूर करावीत. त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शिर्डी येथे केली.

पाटील हे शिर्डी येथे आले असताना त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे, की कोपरगाव मतदारसंघात पर्यटन वाढीसाठी अंतर्गत रस्त्यांची सुधारणा आवश्‍यक आहे. शिर्डी तसेच शनिशिंगणापूर येथे असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. भरवसफाटा-चास-सावळीविहीर राज्यमार्गासाठी चार कोटी पन्नास लाख तर मुंबई-नागपूर द्रुतगती मार्गाच्या कोपरगाव तालुक्‍यातील भागासाठी पाच कोटी पन्नास लाख असा दहा कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

इंदिरा आवास योजनेंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात घरकुल बांधण्यांसाठी एक गुंठा जागा खरेदीचा निर्णय शासनस्तरावर व्हावा. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ना हरकत दाखला मिळावा, म्हणून घरकुलवासीयांनी प्रकरणे दाखल केलेली आहेत. या प्रकरणी लक्ष घालून संबंधित विभागाना आदेश व्हावे, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)