सुरक्षितेसाठी माणिकनगरवर ‘सीसीटीव्ही’

सुमित वर्मा यांचा पुढाकार : परिसरात बसविले अत्याधुनिक तीन कॅमेरे

नगर – माणिकनगर भागात गेल्या काळामध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे. धुमस्टाईलने मंगळसूत्र चोरीचे प्रकार दिवसा होत आहे. यातून परिसरात असुरक्षितेची भावना गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा यांनी माणिकनगर भागात आनंदषिजी हॉस्पिटल चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. डॉ. आशिष भंडारी आणि जयकुमार गांधी यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन झाले.

माणिकनगर भाग हा उच्चभ्रू लोकांचा ओळखला जातो. त्यामुळे तो भुरटे चोरांच्या नेहमीच रडारवर राहिला आहे. परिसरात त्यामुळे चोरीचे प्रमाण जास्त आहे. या भागात पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे. सुमित वर्मा यांनी दिलेले सीसीटीव्ही कॅमेरे माणिकनगर भागातील नागरिकांसाठी सुरक्षा कवचचे काम करतील, अशी भावना डॉ. भंडारी यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुमित वर्मा यांनी उचललेले पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे.

माणिकनगरसह परिसरातील काही भागात अशाचपद्धतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज जयकुमार गांधी यांनी व्यक्त केली. सुमित वर्मा यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत स्थानिक नागरिकांनी त्यांचा सत्कार केला. धनेश गांधी, यश मुनोत, जगदीश लोखंडे, ऍड. रोहित बलदोटा, योगेश गुंड, वर्धमान लुणावत, संकेत जरे, प्रवीण आढाव, प्रमोद जाधव उपस्थित होते.

“या परिसरातील नागरी वस्ती वाढत आहे. भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. महिलांच्या सुरक्षितेचाही प्रश्‍न होता. त्यामुळे सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूच्या परिसरात देखील सुरक्षितेचे उपाय म्हणून लवकरच कॅमेरे बसविणार आहे. पोलीस चौकीसाठी लढा देणार आहे. – सुमित वर्मा जिल्हाध्यक्ष, मनविसे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)