महापालिकेच्या प्रवेशद्वारावर टाकले ट्रॉलीभर ‘अॅनिमल वेस्ट’

बुरूडगावच्या ग्रामस्थांचा आक्रमकपणा; प्रशासनाकडून कारवाईचे संकेत

नगर – बुरूडगावच्या ग्रामस्थांचा आज संयमाचा कडेलोट झाला. शहरातून उचलण्यात येणारे अॅनिमल वेस्टच्या ट्रॅक्‍टरची ट्रॉली महापालिकेच्या दालनात आणून टाकण्यात आले. आज रात्री सात वाजता हा प्रकार झाला. ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महापालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान, बुरूडगाव ग्रामस्थांनी केलेल्या प्रकाराविरोधात कारवाईची तयारी महापालिका प्रशासनाने केली होती. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी हे याबाबत निर्णय घेतील असे प्रशासकीय पातळीवरून सांगण्यात आले.

बुरूडगाव येथील कचरा डेपोत अॅनिमल वेस्ट उघड्यावर टाकण्यास हरित लवादाकडून मनाई करण्यात आली आहे. तसा लवादाचा निकालच आहे. हे अॅनिमल वेस्ट निकाली काढण्यासाठी महापालिकेला प्रकल्प उभा करण्याचा आदेश लवादाने दिला आहे. त्यावर महापालिकेकडून कार्यवाही सुरू आहे. परंतु महापालिकेकडून या भागात ऍनिमल वेस्ट टाकण्याचे काम सुरूच आहे. दोन दिवसापूर्वी आणि आजही तसेच झाले. अॅनिमल वेस्ट घेऊन आलेल्या ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीमधून मांस रस्त्याने पडत चालले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून ग्रामस्थांनी त्याची माहिती दिली. परंतु महापालिका प्रशासनाकडून त्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी हा ट्रॅक्‍टर अडविला. हळूहळू ट्रॅक्‍टरजवळ ग्रामस्थांची गर्दी झाली आणि तो ताब्यात घेतला.

महापालिका प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही, हे लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी हा ट्रॅक्‍टर ताब्यात घेत तो महापालिकेच्या मुख्य कार्यालयात आणला. हा ट्रॅक्‍टर तिथे आणून प्रशासनाची संवाद साधण्याचा प्रयत्न झाला. तिथेही ग्रामस्थांना प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी ग्रामस्थांचा संयम सुटला आणि ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीमधील अॅनिमल वेस्ट इमारतीच्या मुख्य दरवाज्यासमोर टाकून देण्यात आले.

ग्रामस्थांच्या या आक्रमकपणाची माहिती महापालिकेला प्रशासनाला मिळाली, तोपर्यंत खूपच उशिर झाला होता. महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांना बोलावून घेत रात्री उशिरा हे अॅनिमल वेस्ट उचलले. दरम्यान, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाईचे संकेत दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)