राज्यस्तरीय मिक्‍सबॉक्‍सिंग स्पर्धेत नगरची उत्कृष्ट कामगिरी

नगर – रायगडमध्ये धाटव क्रीडा संकुल येथे पहिली राज्यस्तरीय मिक्‍स-बॉक्‍सिंग स्पर्धा झाली. मिक्‍स-बॉक्‍सिंग हा पूर्णतः नवीन व भारतीय खेळ आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत नगरला तिसऱ्या क्रमांकाचे विजेतेपद मिळाले.

या स्पर्धेत तेजस रासकर, चैतन्य कचरे व कृष्णा आठरे, अविनाश चौहान, गणेश चव्हाण, यश धाडगे, सुजीत रोकडे, शिवप्रिय माने, स्वप्नील काळे यांनी सुवर्णपदक पटकाविले. त्याचबरोबर अविष्कार गुंजाळ, आकांक्षा चव्हाण यांनी रौप्यपदक पटकाविले. त्याचप्रमाणे कार्तिक शेळके, हरी सानप, प्रणव पठारे, राजेश पाटील यांनी कांस्यपदक पटकाविले.

या सर्व खेळाडूंचे प्रहार संघटनेचे अजय महाराज बारस्कर, आमदार शिवाजी कर्डिले, अक्षय कर्डिले, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे व जिल्हा मिक्‍स-बॉक्‍सिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले व पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी विजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना नारायण कराळे, स्वप्नील काळे व अश्विनी चौहान शेंडी, सूर्यनगर, बुऱ्हाणनगर, चेतना कॉलनी, नांदगाव शिंगवे व शेवगाव या ठिकाणी प्रशिक्षण देत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)