दुष्काळासाठी शेतकरी उतरला रस्त्यावर

बोधेगाव  : बोधेगाव भागात दुष्काळ जाहीर करावा, जनावरांच्या चाऱ्यासाठी छावण्या व पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सुरु करावा, खरीपाची पीक आणेवारी कमी करण्यात यावी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी बैलगाडीसह शुक्रवारी सकाळी शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर तीन तासाने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

शेवगावच्या पूर्व भागातील बोधेगावसह परिसरात पुरेशा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला. दुष्काळजन्य भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. मजूरांच्या हाताला काम नाही, पावसाने दगा दिल्याने खरीप हंगामातील कपाशी, तूर, बाजरी आदी पिके जळून गेल्याने हंगाम वाया गेला. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला बोधेगाव मंडळात फक्त 124 मिमी पाऊस झाला. मात्र प्रशासनाने प्राथमिक पिक आणेवारी 54 टक्के चुकीची लावली.

-Ads-

प्रत्यक्ष पीक पाहणी करून आणेवारी कमी करण्याची आवश्‍यकता आहे. चाऱ्यांचा प्रश्न गंभीर निर्माण झाल्याने जनावरासाठी छावण्या व पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सुरु करण्यात यावा, रब्बी हंगामासाठी बी बियाणे खरेदीसाठी अनुदान द्यावे या प्रमुख मागण्यासाठी बोधेगाव येथे शेवगाव-गेवराई राज्य मार्गावर सर्वपक्षिय कार्यकर्त व शेतकऱ्यांनी सकाळी 8 वाजता रस्ता रोको आंदोलन केले.

यावेळी आंदोलनात ज्येष्ठ नेते पाटीलबा तांबे, कुंडलिकराव घोरतळे, भाऊराव भोंगळे, माजी सरपंच विष्णू वारकड, विजय पाटील, माणिक गर्जे, भाजपचे विश्वनाथ घोरतळे, गणपत खेडकर, परमेश्वर तांबे, प्रमोद विखे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संतप्त भावना व्यक्त केल्या. महसूल प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाचा जाहीर निषेध केला. आठ दिवसात शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. आंदोलनात शाहीर बबन टकले यांनी शेतकऱ्याच्या ज्वलंत प्रश्नावर पोवाडा तर परमेश्वर तांबे यांनी कवीता सादर केली.

आंदोलनात शिवाजी पवार, आकाश दसपुते, गंगाधर घोरतळे, अनिल घोरतळे, ज्ञानदेव घोरतळे, शिवाजीराव पवार, प्रल्हाद शिंदे, गहिनाथ बडे, बाळासाहेब काशीद, बाबा पठाण,नरेंद्र कुमार यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ सहभागी झाले होते आंदोलकांची शेवगावचे नायब तहसीलदार मयूर बेरड, मंडळाधिकारी विष्णू बडे , तलाठी अमर शेंडे यांनी भेट घेत लेखी आश्वासन दिल्यानंतरआंदोलन मागे घेतले. शेवगावचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, नितीन मगर यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)