भाजप किसान मोर्चाची पाथर्डी तालुका कार्यकारिणी जाहीर

पाथर्डी – भाजप किसान मोर्चाची पाथर्डी तालुका कार्यकारिणी नुकतीच तालुकाध्यक्ष आजिनाथ शिरसाट यांनी जाहीर केली. भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

यावेळी भाजप भटक्‍या विमुक्त आघाडीचे प्रदेशमंत्री राहुल कारखेले, भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऍड. युवराजजी पोटे, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ढाकणे ,भाजप भटक्‍या विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बंडू जायभाय, अल्पसंख्याक आघाडीचे नवाब थाई शेख, युवा मोर्चाचे महेश दौंड उपस्थित होते.

-Ads-

नवनियुक्‍त कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे.तालुका सरचिटणीसपदी नवनाथ वाघ (चितळी), चिटणीस जगदीश मोरे (भिलवडे), महिला अध्यक्ष संगिता कराड (शिरसाटवाडी), उपाध्यक्षपदी आजिनाथ धायतडक (धायतडकवाडी), रोहिदास घोडके (रांजणी),सुभाष दौंड (सोनशी), सदाशिव मरकड (मढी), बाळासाहेब मुंडे (आगसखांड), भिमराव आंधळे(जिरेवाडी), प्रल्हाद कासुळे (औरंगपुर), अंबादास घुले (काटेवाडी खरवंडी) यांची निवड करण्यात आली.

ढाकणे म्हणाले, पाथर्डी तालुक्‍यावर दुष्काळाचे भयानक संकट कोसळले आहे. सत्ताधारी पक्षात असून जनतेला दिलासा देणे आपले काम आहे.दुष्काळात भाजपच्या किसान मोर्चाची भूमिका महत्त्वाची असून शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्या अडचणी आपण समजावून घ्यायला हव्यात. शासन दरबारी पाठपुरावा करून दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला आपण सर्व मिळून मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करू. नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी समर्थपणे पेलून पक्ष वाढीचे कार्य करावे, असे आव्हान ढाकणे यांनी यावेळी केले. सुत्रसंचालन बाळासाहेब ढाकणे यांनी केले तर आदीनाथ धायतडक यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)