भाजप पदाधिकाऱ्यांवर प्रभागाची जबाबदारी

जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांची माहिती

नगर – महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता येण्यासाठी पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांसह तालुकाध्यक्षांवर एका-एका प्रभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे. लवकरच कोणाकडे कोणता प्रभाग आहे हे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी दिली.

महापालिका निवडणुकीच्या प्रचार नियोजनासाठी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक बेरड यांच्या अध्यक्षतेखाली व शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या कार्यालयात झाली. यावेळी सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, प्रकाश चित्ते, शहर चिटणीस किशोर बोरा, युवराज पोटे, विवेक नाईक, सुर्यकांत मोरे, भाऊसाहेब वाकचौरे, भैय्या गंधे, दिलीप भालसिंग उपस्थित होते.

खा. गांधी म्हणाले, पक्षाला कधी नव्हे एवढे चांगले वातावरण यावेळी निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही निवडणूक स्वबळावरच लढून एक हाती सत्ता महापालित आणायची आहे. भाजप ही निवडणूक विकासाच्या मुद्‌द्‌यावर लढणार आहे. या निवडणुकीसाठी जय्यत तयारी व नियोजन केले आहे. जिल्हा कार्यकारणीची साथ आता मिळणार आहे. त्यामुळे अधिक प्रभावी प्रचार यंत्रणा राबवता येईल.

बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस प्रसाद करीकर यांनी केले. यावेळी नितीन कापसे, माणिक खेडकर, सोमनाथ खेडक, सिताराम भांगरे, सुभाष दुधाडे, नितीन उदमले, चंद्रकांत जाधव, सचिन देसरडा, आनंद रुपनर, शरदराव थोरात, हरिभाऊ लहाने, कैलास खैरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)