भाजप विरोधकांच्या विकेट घेणार

संग्रहित छायाचित्र

पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्धार

नगर – केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांच्या उन्नत्तीसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्याचा लाभ अनेकांना झाला आहे. विरोधकांनी आपल्या सत्ता काळात अनेक योजनांची घोषणा केली परंतु त्याचा लाभ जनतेला मिळवून दिला नाही. पण भाजपाच्या सरकारने राबविलेल्या धोरणांमुळे या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहल्या आहेत. यामुळे भाजपावरील लोकांचा विश्‍वास वाढत आहे. कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे भाजपाची संघटनात्मक रचना पॉवर फुल झाली असून, आगामी निवडणुका मोठ्या फरकाने जिंकू. पक्षाचे शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख हे विरोधकांची विकेट घेतील. दोन्ही लोकसभा व 12 विधानसभेवर भाजपाच झेंडा फडकेल, असा आत्मविश्‍वास जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला.

भाजपाच्यावतीने एमआयडीसी जिमखाना येथे आयोजित अहमदनगर लोकसभा क्षेत्रातील शक्तीकेंद्र प्रमुख व विस्तारक बैठकीत मार्गदर्शन करतांना पालकमंत्री राम शिंदे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, आ.बाळासाहेब मुरकुटे,आ.मोनिका राजळे, माजी आ.बबनराव पाचपुते, माजी आ.चंद्रशेखर कदम, अस्मिता पाटील, प्रकाश चित्ते, जालिंदर वाकचौरे, प्रसाद ढोकरीकर, श्‍याम पिंपळे, अरुण मुंडे, संतोष लगड आदि मान्यवर उपस्थित होते.

विरोधकांना नेहमी सत्तेची सवय होती. परंतु मागील चार वर्षात त्यांची अवस्था जलाविना मासळी सारखी झाली आहे. आमच्यासारखे राजकीय वारसा नसणारे मंत्री त्यांना मान्य नव्हते. मात्र राज्यात जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना, उज्वला गॅस, पंतप्रधान आवास योजना या प्रभावीपणे राबविल्याने जनतेचा भाजपावरील विश्‍वास अधिक बळकट झाला आहे. राज्यातील प्रत्येक निवडणुकीत पक्षाने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला नामोहरम केले आहे. शक्तीकेंद्र प्रमुख हे पक्षाचा आधारस्तंभ असून, उद्याचे नेते आहेत. भविष्यात ते आमदार-खासदार देखील होतील. त्यामुळे ही सुवर्णसंधी समजून प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन ना.शिंदे यांनी केले.

जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड म्हणाले की, राज्यात संघटनात्मकदृष्ट्‌या अहमदनगर जिल्हा पहिल्या पाच मध्ये असून, आपल्याला पहिला क्रमांक मिळवायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने कामाला लागावे. आगामी सर्व निवडणुकांची तयारी ही सुरु झाली असून, आपआपल्या भागात पक्ष संघटनेने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार शक्तीकेंद्र व विस्तारक यांनी काम करावे.

केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्या गरजूंपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. जिल्ह्यात भाजपासाठी पोषक वातावरण असून, येणार्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाचाच विजय झालेला आपणास दिसेल.असे सांगून संघटनात्मक बाबी व कार्यविस्तार योजनेचा आढावा घेतांना पहिल्यांदाच हातात छडी घेतली. व विस्तारक पदाधिकाऱ्यांना वेळेत काम करण्याचे आदेश दिले.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, आ.बाळासाहेब मुरकुटे, आ.मोनिका राजळे, बबनराव पाचपुते आदिंनी यावेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सचिन तांबे, सुवेंद्र गांधी, विस्तारक मनोज कुलकर्णी, राहुल लांडे, हेमंत भालेराव, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्‍याम पिंपळे यांनी केले तर आभार प्रसाद ढोकरीकर यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
13 :thumbsup:
44 :heart:
21 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)