मटका जुगारांवर पोलिसांचे छापे

नगर – शहरातील विविध भागात सुरू असलेल्या मटका जुगारावर शहर पोलीस उपअधीक्षकांना कारवाईचा बडगा उचलला आहे. कोंड्यामामा चौक व भिंगारच्या विजयनगर येथे ही कारवाई करण्यात आली. या दोन वेगवेगळ्या कारवाईत सुमारे 40 हजार 326 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोंड्यामामा चौकात एका टपरीमध्ये सुरू असलेल्या आडोशाला मटका जुगारावर छापा घालण्यात आला. वल्लभ मोहनलाल पटेल (रा. वंजारगल्ली), कल्याण बाळासाहेब तारगे व मुन्ना भिंगारदिवे (दोघे रा. मंगलगेट) या तिघांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 14 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भिंगार येथील विजयनगर येथील मटका जुगारावर छापा घालत पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. अभिषेक किशोर भगवाने, गणेश कुशाबा पाठक व रवीराज धनराज संगत (तिघे रा. नेहरू कॉलनी, भिंगार), नीलेश दिलीप वाघस्कर (रा. धनगरगल्ली, भिंगार) व अशीर्वाद पवने (रा. भिंगार) यांच्याविरुद्ध भिंगार कॅंप पोलिसांनी कारवाई करत पोलिसांनी 25 हजार 976 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)